घटक 2

घटक 2

वर्तुळकंस, वर्तुळपाकळी, वर्तुळखंड Activity 1 – शिक्षकांनी विद्यार्थ्यांना बांगडीचे तुकडे जोडून पुन्हा बांगडीचा आकार तयार करावयास सांगावा. त्यावरून तुकड्यांचे प्रकार ठरवावेत. Activity 2 – घड्याळ, वर्तुळाकृती नेलबोर्डच्या साहाय्याने अर्धवर्तुळकंस, लघुकेंद्रीय कोन, विशाल केंद्रीय कोन दाखवून विद्यार्थ्यांना प्रत्येक ठिकाणी तयार झालेल्या संबंधित कंसांच्या लांबीची तुलना गणिती संवादाद्वारे करावयास सांगावी. Activity 3 – शिक्षकांनी विद्यार्थ्यांना घड्याळाच्या एका मिनिटाच्या परिभ्रमणातून तयार होणाऱ्या केंद्रीय कोनाचे मापाची नोंद करून त्यावरून वर्तुळाच्या अंशात्मक मापाचे गणन करण्यास सांगावे. Activity 4 – फूल, सेंच्युरी पेपर इ. वापरून वर्तुळपाकळी ओळखण्यास सांगावे. संबंधित वर्तुळपाकळीच्या केंद्रीय कोन (q), लघुकंसाची लांबी (l), त्रिज्या (r), इ. घटकाची मापने घेण्यास सांगावे. वर्तुळपाकळ्या पुन्हा जोडून वर्तुळाच्या अंशात्मक मापाचा पडताळा घेण्यास सांगावे. Activity 5 – वर्तुळपाकळीचे घटक यांच्या किमती बदलून वर्तुळपाकळीच्या संबंधित लघुकंस व आकारात होणाऱ्या परिणामासंदर्भात गणिती संवादातून चर्चा घडवून आणावी. Activity 6 – वर्तुळाकृती केक, पोळी, पापड कोणत्याही जीवेतून कापून तयार होणाऱ्या वर्तुळाच्या भागांचे विद्यार्थ्यांना निरीक्षण करायास सांगावे.वर्तुळखंड.